
मालेगाव ( प्रतिनिधी ). महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या च्या मराठी अध्यापक विद्यालय मालेगाव येथे. शिक्षक व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या उदघाट्नाच्या सत्रात छात्र अध्यापक ( D Ed students =भावी शिक्षक ) यांच्याशी कवितेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा योग आला .. नेहमी प्रमाणे टाळ्यांचे गजर आणि हास्याच्या फवारे उडत राहिले… माझ्या सर्वच कविताना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.. दीड तास चाललेली मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली…
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. V. D सोनवणे सर यांनी भूषविले तर विशेष अतिथी म्हणून सौंदाणे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. आर. एम.बाचकर सर उपस्थित होते … भावी अध्यापिकानी छान सूत्र संचलन केले.
कार्यक्रम यशस्वीते साठी, मा.पवार सर,मा.पाटील सर, मा.मगरे सर मा. खैरनार सर यांनी प्रयत्न केले.

