
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
ऐन गणेशोत्सवाचे कालखंडात आहुर्ली सह परिसरात वीजेचा लंपडाव सुरु होता.दरम्यान हेच हिंदुचें का सरकार ? ऐन गणेशोत्सवाचे कालखंडात वीज गुल. या आशयाची बातमी दोन दिवसापुर्वी नांदगाव गणतंत्र न्युज या न्युज पोर्टलवर झळकताच आज वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला आहे.
ऐन गणेशोत्सवाचे कालखंडात संध्याकाळी ६ नंतर अकस्मात वीज गायब , तर रात्री उशीरा वीज अकस्मात येणे हा प्रकार सुर होता.
दरम्यान वीज वितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे गणेश भक्तामध्ये संताप व्यक्त करणेत येऊन वीज वितरणचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल उपस्थित केला होता.
हेच का हिंदुत्ववादी विचाराचें सरकार ? हेच का या सरकारचे अच्छे दिन ? हिंदुच्यांच सणात वीज गुल का व कशी होते ? असे सवाल नागरिकानीं केले होते.
गणेशोत्सव हा सण महाराष्ट्राची एक सांस्कृतीक ओळख आहे. महाराष्ट्रातील गाव न गाव, व गावातील गल्लीच्या हर एक कोपर्यात गणपती बाप्पास विराजमान केले जाते.या शिवाय घराघरात ही गणरायाचे आगमन होते.हा दहा बारा दिवसाचा काळ अत्यंत आनंदात साजरा होतो.
मात्र वीज वितरण चे ढिसाळ नियोजन व अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आहुर्ली परिसर ऐन गणेशोत्सवाचे कालखंडात अंधारात बुडाला होता.
नांदगाव गणतंत्र न्युज च्या दणक्यानंतर आहुर्ली परिसरात सांयकाळचा खंडित होणारा वीज पुरवठा थांबला आहे.

