
होरायझन, र. ज. चव्हाण,केंद्रीय विद्यालय, आदर्श, पुरुषोत्तम, लिटल एंजल आणि भोसला उपांन्त्य फेरीत.
नाशिक ( प्रतिनिधी ) : यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे दिनांक १६ ते १८ सप्टेंबर, २०२६ दरम्यान ३८ व्या खुल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या गटवार साखळी सामन्यात १७ वर्षे मुलींच्या गटात होरायझन, केंद्रीय विद्यालय, आदर्श आणि र. ज. चव्हाण यानी गटातील सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश केला.

तर १७ वर्षे मुलाच्या गटात मखमलाबाद, केंद्रीय विद्यालय, टी.जे.चाव्हाण, के. टी. एच.एम., लिटिल एंजल, आर. वाय. के. यांनी आपल्या गटात सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
१४ वर्षे मुलींच्या गटात केंद्रीय विद्यालय, र. ज. चव्हाण आणि एस्पालीयर यांनी बाद फेरीत प्रवेश केला.
तर मुलांच्या गटात केंद्रीय विद्यालय, लिटिल एंजल, पूरुशोत्तम आणि भोसला या सघानी सुंदर खेळ करून उपांन्त्य फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धाेला मंदार देशमुख, किशोर शीरसाठ, अशोक दुधारे ,राजू शिंदे,
राजेंद्र शिंत्रे, विजय खरोटे, प्रमोद जाधव, आदी मान्यवरानी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

. हे या स्पर्धेचे ३८ वे वर्ष असून विविध गटातील खेळाडूंना स्पर्धेचा सराव मिळावा आणि या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळात प्रगती साधावी हा या स्पर्धा आयोजनामागील हेतू आहे. खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळायला मिळावे हा या स्पर्धा
आयोजनामागील हेतू आहे.
यासाठी या स्पर्धा साखळी आणि बाद पद्दतीने खेळविले जात आहेत.
उद्या सकाळच्या सत्रात सर्व गटाचे उपांत्य सामने खेळविले जाणार असून दुपारी सर्व गटांचे अंतीम सामने खेळविले जाणार असून त्यानंतर पारितोषीक वितरण समारांभ होणार आहे.
या स्पर्धा यशस्वी करणेसाठी
आनंद खरे, अविनाश खैरनार, यांच्या मार्गदर्शनाखााली यावंत व्यायाम शाळाचे वरीष्ठ खेळाडू परीश्रम घेत आहेत.
आज झालेल्या सामन्याचे निकाल :-
१४ वर्षे मुले : १) केंद्रीय विद्यालय विजयी विरुद्ध टी. जे. चव्हाण.
२) पुरुषोत्तम स्कुल विजयी विरुद्ध भोसला स्कुल , ३) लिटिल एन्जल विजयी विरुद्ध भोसला स्कुल
१४ वर्षे मुली : १) केंद्रीय विद्यालय विजयी विरुद्ध एस्पालीयर.
२) र. ज. चव्हाण विजयी विरुद्ध एस्पालीयर.
३) केंद्रीय विद्यालय विजयी विरुद्ध र. ज. चव्हाण.
१७ वर्षे मुले : १) सेंट लॉरेन्स स्कुल विजयी विरुद्ध टी. जे. चव्हाण,
पुरुषोत्तम स्कुल विजय विरुद्ध केंद्रीय विद्यालय.
३) मखलाबाद स्कुल विजयी विरुद्ध के. टी एच. एम.

