
नाशिक ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या १४ व १९ वर्षाआतील जिल्हास्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुलात दिमाखात पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमधून १४ वर्षांखालील व १९ वर्षांखालील मुला-मुलींचे ३१ संघ सहभागी झाले आहेत. विद्यार्थी खेळाडूंमध्ये स्पर्धेबाबत मोठा उत्साह असून, मैदानावर क्रीडाकौशल्याची चुरस पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन रग्बी क्रीडा जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना य रग्बी खेळाची वैशिष्ट्ये, खेळाचे नियम, संघभावना बाबत माहिती देत खेळ हा केवळ मैदानापुरता मर्यादित नसून, जीवन जगण्याची शिस्त आणि संघर्ष करण्याची ताकद शिकवतो. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी जिंकणे-हरणे यापेक्षा प्रामाणिकपणे खेळण्याला आणि सातत्याने प्रयत्न करण्याला महत्त्व द्यावे,असे सांगत त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळीजेष्ठ साहित्यिक राजेंद्र सोमवंशी सर, राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सेक्रेटरी मनोज कनोजिया, म. के. वाघ, सहसचिव अनिल ढोकणे पंच महेश राठोड,अजय पवार,अक्षय करंजकर,क्रीडा शिक्षक राहुल मोरे, योगेश्वर मोजाड, विकी मुठाळ पुनीत आवटे प्रतीक कडाळे सुनील देवरे, गणेश राऊत, संजय बागुल, किशोर बोरसे, भूषण सोनीस, सखाराम बर्डे, संदीप गांगुर्डे कलीम अन्सारी यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक, पंच, शिक्षक, विद्यार्थी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या सामन्यांमधील निकाल खालील प्रमाणे
14 वर्षाखालील मुले मनपा
विजयी नवजीवन स्कूल
उपविजेते के के वाघ गंगापूर
तृतीय स्थान बॉईज टाऊन.
14 वर्षाखालील मुली मनपा
विजयी साधना एज्युकेशन उपविजयी बॉईज टाऊन.
14 वर्षाखालील मुले ग्रामीण
१. असिमा शैक्षणिक संस्था इगतपुरी
२. नूतन विद्यामंदिर भगूर
- आमित पणंड्या नूतन विद्यामंदिर वंजारवाडी
19 वर्षाखालील मुली मनपा
१. विजयी सिक्रेट हार्ट नाशिक
- उप विजयी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय
- तृतीय स्थान साधना एज्युकेशन.
19 वर्षाखालील मुली ग्रामीण
१. नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प
- असीमा बाल शैक्षणिक केंद्र इगतपुरी
- महात्मा गांधी विद्यामंदिर इगतपुरी
19 वर्षे खालील मुली मनपा
१. सीक्रेट हार्ट नाशिक - पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय नाशिक रोड
- साधना एज्युकेशन नाशिक रोड
सर्व संघ व्यवस्थापक आणि विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. विजय सर्वांची निवड विभागीय पातळी साठी झालेली आहे.

