संस्थेचे छत्र, पालकांची साथ… सावित्रीच्या लेकींची लोहगाव (पुणे) कडे नवी वाट!

सिन्नर ( प्रतिनिधी ) सगर विद्या प्रसार शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महिला महाविद्यालयातील १३ सावित्रीच्या लेकी आज एका नव्या ध्येयाने, नव्या आशेने ‘नव गुरुकुल फाउंडेशन, लोहगाव (पुणे)’ च्या दिशेने रवाना झाल्या!
आयुष्यात मोठी भरारी घेण्याची सुवर्णसंधी संस्थेने उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे तेज स्पष्ट दिसत होते. विशेष म्हणजे, आपल्या लेकींना सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी आणि या नव्या प्रवासात त्यांना धीर देण्यासाठी पालक स्वतः विद्यार्थिनींसोबत लोहगाव (पुणे) च्या दिशेने रवाना झाले आहेत.

या खास प्रसंगी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री. नामदेव लोणारे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. “संस्था सदैव तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील,” असा विश्वास देत त्यांनी विद्यार्थिनींना मोठे पाठबळ दिले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मधुकर देशमुख आणि प्रा. अनिल गोसावी यांनी देखील उपस्थित राहून विद्यार्थिनींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“झेप घ्यायला तयार झाले, पंख नवी पहाट…
सावित्रीच्या लेकींची आता, संघर्षाची वाट!
नव्या युगाची स्वप्ने घेवुन, चालल्या पुढे पुढे…
भविष्याचे सोनेरी क्षण, येती आता पुढे!”
सावित्रीच्या सर्व लेकींना पुढील यशस्वी आणि उज्ज्वल प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

