
नांदगाव येथील मन्याड चौकी येथे लहान मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेत श्रावण दामू मोरे यांनी दुर्दैवाने आत्महत्या केली होती. या अत्यंत क्लेशदायक घटनेच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या दुःखात सहभागी होत मोरे कुटुंबीयांना माणुसकीच्या नात्याने आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई सुहास कांदे यांनी मोठा आधार दिला आहे.

आज नांदगाव येथील ‘देवाज् बंगलो’ या निवासस्थानी श्रावण मोरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले. याप्रसंगी कांदे परिवाराकडून मोरे कुटुंबीयांना जीवनोपयोगी किराणा, धान्य तसेच रोख स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.


