
नांदगाव ( प्रतिनिधी) नांदगाव शहरातील श्रीराम नगर मित्र मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या श्री गणरायाची आरती लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

यावेळी नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे यांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. आरतीच्या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले.

या प्रसंगी श्रीराम नगर मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

आरतीनंतर उपस्थित गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात परिसर दुमदुमून टाकला.

