
नांदगाव ( प्रतिनिधी :महेश पेवाल) नांदगाव येथील वर्ष प्रथम चौथा स्तंभ गणेश मित्र मंडळाने निसर्ग वाचवा असा दिलेला संदेश अत्यंत मोलाचा असून अन्य लोकांनी याचा विचार करावा आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन नांदगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांनी चौथा स्तंभ गणेश मित्र मंडळाला दिलेल्या भेटी प्रसंगी केले. यावेळी त्यांचा मंडळाच्या वतीने वृक्ष रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
नांदगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांनी मंडळास भेट दिली व मंंडळाचे कौतुक केले


नांदगाव येथील जेष्ठ नागरिक यांनी मंडळास भेट देऊन मंडळाचे कौतुक केले
सण – उत्सव साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत शहरातील पत्रकार बांधवांनी चौथा स्तंभ गणेश मंडळांची स्थापना करत पर्यावरणपूरक, ध्वनीप्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला असून पहिल्याच वर्षी ध्वनीप्रदूषण त्याचे दुष्परिणाम, अल निनो त्याचा संपूर्ण जगावर झालेला परिणाम, निसर्ग वाचवण्यासाठी वृक्षसंवर्धन आदी विषयांवर चित्रकृतींच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

शहराचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे,सहायक पोलीस निरीक्षक गावित यांना मंडळातर्फे भेटी प्रसंगी वृक्षरोप देऊन स्वागत केले
पर्यावरण पुरक सजावट करण्यात आली असून गणेश मंडपात कोणत्याही प्रकारचे वाद्ये वाजवली जात नाहीत. दररोज मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करताना तोंडी आरती म्हटली जाते. मान्यवरांना शाल श्रीफळ न देता, झाडाचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार केला जातो. शुक्रवार (दि.१८) रोजी आमदार सुहास कांदे यांचे विश्वासू सहकारी तथा नांदगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावतीने मंडळाला भेट देत गणरायांची आरती करत दर्शन घेतले. मंडळाने पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी देखावा सादर केला असून याचे त्यांनी कौतुक केले आहे. अन्य लोकांनी देखील तुमच्या कार्याचे अनुकरण केले पाहिजे असे गौरवोद्गार काढले. यापुर्वीही शहराचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे,सहायक पोलीस निरीक्षक गावित व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक दत्तराज छाजेड व नगरसेवक काशिनाथ देशमुख काव्यझुलाचे कवी लेखक प्रा.सुरेश नारायणे नांदगाव विश्व हिंदू परिषद बजरंग दल जेष्ठ नागरिक संघटना यांनी देखील

समाजप्रबोधनपर देखाव्याचे कौतुक केले आहे.चौथा स्तंभ गणेश मित्र मंडळाला अनेक राजकीय नेते,प्रतिष्ठीत नागरिक, महिला, पुरुष.बाल गोपाळ भेट देत असून मंडळाने सादर केलेल्या पर्यावरण पुरक देखाव्याचे कौतुक केले जात आहे.

