
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४०० वा दिवस

🎯 ध्येयप्राप्तीच्या तीन अवस्था –
कोणतेही कार्य तीन अवस्थांमधून पुढे जात असते उपहास,(Ridicule) विरोध (Opposition) आणि अंतिमतः स्विकार. (Acceptance) काळाच्या पुढे पाहणाऱ्या द्रष्ट्यांचा नेहमी उपहास होतो. म्हणून विरोध, छळ या सर्वांचे नेहमीच स्वागत केले पाहिजे. मात्र आपले मन सतत स्थिर असले पाहिजे, चरित्र शुध्द असले पाहिजे. नैतिकतेचे अधिष्ठान आपल्या ठायी असावे. आपल्या मनात परमेश्वराच्या ठायी नितांत श्रद्धा व भक्ती पाहिजे. विरोधाच्या वावटळी या श्रद्धेने पाहता-पाहता विरून जातील आणि अंतिमतः आपलाच विजय होईल अशी दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्या ठायी असली पाहिजे. ध्येय प्रामाणिक असेल, तर सुरुवातीच्या त्रासाला कदापि न घाबरता सतत पुढे जात राहा; कारण आज विरोध करणारेच उद्या तुमच्या यशाने तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास ३० शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२६
★ देवमामलेदार यशवंतराव महाराज प्रागट्य/जन्मोत्सव सोहळा सटाणा
★ १९२९ शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्मदिन
★ १९८२ मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा स्मृतीदिन
★ संस्कार व शिक्षण जागृती दिन.
★ आंतरराष्ट्रीय शांतता दिन.
✍️ विवेकानंदांचे जाज्वल्य, प्रेरणादायी व अनुकरणीय असे मनुष्य निर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे विचार नियमित व अखंडितपणे गत नऊ वर्षांपासून (३१ मे २०१७) पासून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा सातत्यपूर्ण संकल्पाचा ३४०० वा दिवस आहे. १३ वा जागतिक विक्रम नोंदविला गेला आहे. हे वैचारिक अग्नीहोत्र असेच सतत तेवत रहावे यासाठी ठाकूरांच्या, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना व आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादाची अपेक्षा…
प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे विवेकानंद विचारदूत 9921976422

