
अकोला: (बबनराव आराख) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला – साहित्य आणि संस्कृती मंडळ,अकोला यांचे विद्यमाने आयोजित खडकी येथे “बहारदार कविसंमेलन ” दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.याप्रसंगी कवि संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री -श्रीमती उमाताई गवई होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त नायब तहसिलदार, प्रसिध्द साहित्यिक मनोहर नागे , ज्येष्ठ कवि तथा जिल्हा सत्र न्यायालय,अकोलाचे अॅड. प्रजानंद उपर्वट होते .सुरूवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव , बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिव्य प्रतिमेस कवि संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती उमाताई गवई यांचे हस्ते हारार्पण करण्यांत आले. दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यांत आले. त्यानंतर अध्यक्षा उमाताई गवई यांचे शॉल व पुष्प बुके देवून प्रसिध्द कवयित्री लताताई लोणारे आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक शिरसाट यांचे हस्ते स्वागत करण्यांत आले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मनोहर नागे आणि अॅड. प्रजानंद उपर्वट यांचे स्वागत सुप्रसिद्ध कवि सुनील लव्हाळे, राहूल भगत, देवानंद गवई , एस.एस.हातोले यांचे हस्ते करण्यांत आले. याप्रसंगी संमेलनाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.अशोक शिरसाट यांनी केले. ज्येष्ठ कवि,गझलकार तथा दै. पुण्य नगरीचे जिल्हा प्रतिनिधी संजय खांडेकर यांच्या ‘लोकशाही ‘ या गझलेने कविसंमेलनाची सुरूवात झाली. देवानंद गवई, बाळाभाऊ दाभाडे , धिरज चावरे , सुनिल लव्हाळे, विजय राऊत (जिजाऊ ), राहूल भगत, भगवंत तायडे ,लताताई लोणारे , चंदाताई वानखडे , चंद्रकांत तेलगोटे, एस.एस. हातोले , सिद्धार्थ तायडे , अर्जुन घुगे, गोपाळ गवई , रामकृष्ण इंगळे , मनोहर नागे, अॅड.प्रजानंद उपर्वट, उमाताई गवई, गजानन छबिले, प्रा.डॉ. अशोक शिरसाट आदि सर्व मान्यवर कवींनी सामाजिक,धार्मिक, राजकिय,पर्यावरणीय तथा मानवतावादी बहारदार काव्यरचना, गझल या प्रसंगी सादर केल्या. तरूणाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदिप देशमुख तथा ज्येष्ठ पत्रकार निखाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कविसंमेलनाचे भारदस्त सुत्रसंचालन आपल्या ढंगदार शैलीत गजानन छबिले यांनी केले., तर आभार प्रदर्शनाची धूरा बाळाभाऊ दाभाडे यांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश अंभोरे, सुप्रसिद्ध ठेकेदार राजेश इंगळे , मंदाताई इंगळे यांनी अथक परिश्रम घेतलेत.

