
मालेगाव (प्रतिनिध)- येथील संगमेश्वर भागातील साधना वाचनालयात गणेशोत्सवानिमित्त भक्तीगीत व गणेश वंदना करण्यात आली.
साधना वाचनालय, साधना सांस्कृतिक समिती व भोसले सर्स कराओके प्रस्तुत स्वराज म्युझिकल गृपच्या वतीने हिंदी व मराठी गीतांमधून गणपतीचे स्तवन करण्यात आले. यावेळी जय गणेश जय या भक्तीगीताने राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. हे गणराया हे गीत संगीता आहेर, पार्वतीच्या बाळा हे साहेबरावआहेर, तूने मुझे बुलाया- संजय पवार, आकाशी झेप घे रे पाखरा- राजेंद्र भोसले, अशी चिक मोत्याची माळ- सौ.संगिता आहेर, मंदिरात अंतरात- सुनिल वडगे, देहाची तिजोरी- राजेंद्र भोसले, देवा हो देवा- कालिचरण बेद, सुख के सब साथी- राजु जंगम, शिर्डी वाले साईबाबा- आसिफ शेख आदी गायकांच्या बहारदार गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. रविराज सोनार यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी माझा गणेश हे काव्यही सादर केले. साधना सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष राजीव वडगे यांनी आभार मानले.
सुरुवातीला जेष्ठ संचालक सुधाकर बागूल व राजीव वडगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
जेष्ठ रसिक व माजी मुख्याध्यापक एल. पी. भालेराव यांनी त्याच्या वतीने सर्व गायकांचा सत्कार केला. तसेच वाचनालयाच्या वतीने ही गुलाबपुष्प देऊन गायकांना सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमास वाचनालयाचे सेक्रेटरी अशोक पठाडे, सहसेक्रेटरी किशोर मोरे,यशवंत वाघ, शिवाजी बागुल, राजेंद्र जगताप,सुरेंद्र टिपरे, बळवंत अहिरे, दिनेश गीते, रोटरी क्लब अध्यक्ष विनय राहुडे, हेमंत पुरकर, नारायण अहिरे, नंदू सूर्यवंशी,ज्योती ब्राह्मणकर जितेंद्र चव्हाण, सौ संगीता वडगे, भारती चव्हाण, सीमा चव्हाण आदी रसिक श्रोते उपस्थित होते. गणपतीची आरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

