
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक गणपती व सजावटीची निर्मिती करण्यात आली. चित्रकला शिक्षक मनीष जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी टाकाऊ व पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करून सात गणपती साकारले.या उपक्रमासाठी विविध टाकाऊ वस्तू, टिश्यू पेपर व पुनर्वापरयोग्य साहित्याचा कल्पकतेने वापर करण्यात आला. गणपतीच्या मूर्तींसोबतच परिसराची सजावटही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीने तयार केली. रंग, आकार, पोत आणि उपलब्ध साहित्य यांचा वापर करून सजावटीला विविधांगी स्वरूप देण्यात आले.गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. टाकाऊ वस्तूंचा योग्य पद्धतीने पुनर्वापर करून त्यांना कलात्मक स्वरूप देता येते, हे विद्यार्थ्यांच्या कलाकृतींतून दिसून आले.या उपक्रमात कृष्णा राजपूत, यश शिरसाठ, तन्मय पवार, अंश गायकवाड, अर्जुन मुर्तडक, अच्युत लाळे आणि मयंक ठाकूर, रुद्र जाधव
कौस्तुभ काळे, वेदांत रोडे,आयुष करडे
प्रणित साळुंखे विराज जाडे आर्यन डाहे
शंतनु लोखंडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गणपती बनवले विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक मनीष जोगळेकर यांनी मार्गदर्शन केले.विद्यालयातील या पर्यावरणपूरक उपक्रमाची नाशिक एज्युकेशन सोसायटी तसेच विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली.

शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक गंगाधर बदादे, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी आणि सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आला.कला आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच पुनर्वापराचे महत्त्व अधोरेखित झाले.

