
पिंपळगाव बसवंत : ( प्रतिनिधी ) वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, उद्योजकता, विपणन, व्यवस्थापन, ऑनलाइन व्यापार आणि डिजिटल व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार व कौशल्यानुसार करिअरची निवड करावी.
वाणिज्य शिक्षण हे केवळ अकाउंटिंगपुरते मर्यादित नसून त्यातून विविध व्यावसायिक क्षेत्रांची दारे खुली होतात.

उद्योजकता हा त्यातील महत्त्वाचा पर्याय असून विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगारनिर्मितीची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे मार्केटिंग, विक्री, ग्राहक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. दिलीप बी. शिंदे यांनी केले.पिंपळगाव ब. येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात वाणिज्य मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ‘वाणिज्य क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्रोफे. डॉ. व्ही. बी. कदम, सकाळ सत्र प्रमुख डॉ. डी. के. सातभाई, डॉ. साहेबराव मोरे, प्रा. भगवान कडलग, डॉ. विजय गायकवाड, डॉ. निशांत वडघुले आदी उपस्थित होते.

डॉ.दिलीप शिंदे पुढे म्हणाले की, वाणिज्य शिक्षण हे केवळ लेखाशास्त्रापुरते मर्यादित नसून त्यातून उद्योजकता, बँकिंग, वित्तीय नियोजन, डिजिटल विपणन आणि व्यवस्थापनाच्या अनेक संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. बी. कदम यांनी विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य, वित्तीय साक्षरता, विश्लेषणात्मक कौशल्य आणि उद्योजकता कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. एस. के. मोरे यांनी केले. डॉ. व्ही. जी. गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. बी. एस. गडाख, तर आभार प्रा. वैभव मापारी यांनी मानले.
यावेळी प्रा.सागर संधान, प्रा.ओम गावले, प्रा. सोपान वाटपाडे, प्रा. विनय कदम, प्रा.मंजूषा भंडारे आणि प्रा.गायत्री पाचोरकर यांसह वाणिज्य विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होत.
फोटो ओळ –
क.का.वाघ पिंपळगाव ब. महाविद्यालयात वाणिज्य मंडळ उद्घाटन कार्यक्रमात बोलताना माजी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, समवेत प्राचार्य प्रोफे. डॉ. व्ही. बी. कदम, डॉ. डी. के. सातभाई, डॉ. साहेबराव मोरे, प्रा. भगवान कडलग डॉ. विजय गायकवाड, डॉ. निशांत वडघुले आदी.

