
नांदगाव ( प्रतिनिधी )आपल्या जन्मापासून ते अगदी शेवटच्या श्वास पर्यंत डॉक्टरांचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येकालाच कधी ना कधी डॉक्टरांकडे जावेच लागते. शारीरिक, मानसिक समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तीच्या सर्व वेदना आणि रोग केवळ एक डॉक्टरच बरे करतात.

त्यामुळे भारतात डॉक्टरांना रुग्णांच्या मनात देवाचा दर्जा दिला जातो. कोरोना महामारीच्या काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच ठरले होते. प्रसंगी डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना ग्रस्त रुग्णांचा जीव कसा वाचवला हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल आहे.

डॉक्टरांच्या या सेवाभावनेनी जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचे कार्य यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय (Dr. Bidhan Chandra Roy) रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै 1991 रोजी भारतात प्रथमच ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा करण्यात आला. मानवतेच्या सेवेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. रॉय हे उत्तम डॉक्टर होते.ते सक्रिय सामाजिक कार्यकर्तेही होते.
वैद्यकीय व्यवसाय जगभर केला जातो वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक उत्कृष्ट डॉक्टर्स आहेत पण भारतातील डॉक्टर्स हे जगभरामध्ये सर्वोत्कृष्ट आहेत ही भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय डॉक्टरांची परंपरा ही हजारो वर्षांपूर्वीपासूनची आहे. अगदी आयुर्वेदापासून आपण भारतीय डॉक्टरांची परंपरा बघतोय. त्यामुळे भारतीय आरोग्य क्षेत्र हे आज जगातील एक सर्वोत्कृष्ट आरोग्य क्षेत्र आहे ही एक अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे. डॉक्टरांकडून तातडीने रुग्णाचा उपचार केला जातो. पण इतर देशांमध्ये तसं नाही त्यासाठी सुद्धा त्यांना अपॉइंटमेंट घ्यावी लागते. यासाठी खरच आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे आणि यासाठी आपल्या भारतीय डॉक्टरांचे आभार मानले पाहिजे. आपल्या देशाचे वैदकीय व्यवसायाचे प्रेरणास्थान मानवता आणि मानवतावादी दृष्टीकोन आहे. येत्या काळात वैद्यकीय व्यवसाय हा फार गतीने बदलत आहे. त्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते आहे त्याचा आपण स्वागतच करूया. पण त्याचबरोबर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजीही घेऊया.डॉक्टरांना योग्य तो सन्मान आणि त्यांचे दैवत्वाचं स्थान आहे डॉक्टर पेशाकडे फक्त एक व्यावसायिक दृष्टिकोनातून न बघता आदराने, सन्मानाने आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे.त्यामुळे आम्हाला असे वाटते की या सर्व गोष्टींकडे सकारात्मकतेने बघून डॉक्टर्स डे निमित्त आपण डॉक्टरांच्या सेवेला आपण कधी कधी घाईगडबडीत त्यांचे आभार मानने राहून जाते पण या ‘डॉक्टर्स डे’ च्या निमिताने त्यांचा साठी खूप काही नाही पण एक फूल व धन्यवाद डॉक्टर असलेले एक फ्रेम फोटो देऊन त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या तळमळीला आणि उत्कटतेला सलाम करण्यासाठी ‘डॉक्टर्स डे’ युवा फाऊंडेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला व शहरातील डॉक्टर बांधवाना समक्ष भेटून डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या!
यावेळी युवा फाऊंडेशन सामाजिक संस्थेचे सुमित सोनवणे, केतन करवा,प्रसाद वडनेरे,आनंद घोडके,तुषार पाटिल,सिद्धेश सोनवणे उपस्थित होते

