
अंदरसूल ( प्रतिनिधी , जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे) तालुक्यातील अंदरसूल येथे गणेशोत्सवा निमित्त अंदरसूल गावातील शिवछत्रपती ग्रुप गणेश मंडळ यांच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.
दरम्यान कर्णकर्कश डीजेयुक्त मिरवणुकीला फाटा देत शिवछत्रपती ग्रुप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजेचा वायफळ होणारा खर्च रांगोळी स्पर्धेत लावला.
त्यामुळे पंचक्रोशीतील रांगोळीप्रेमिंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला.
येवला – अंदरसूल व वाडीवस्तीवरील स्पर्धाकांनी यात सहभागी होऊन विविध विषयांचा आधार घेत रांगोळी काढली.
दरम्यान शेतकरी राजाची करून व्यथा, पंढरीचा पांडुरंग, मॉर्डन दुर्गा, तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, अंदरसूल येथील नागेश्वर महादेव मंदिर, अष्टविनायक, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, स्वामी समर्थ, बेटी बचाव – बेटी पढाव, राजा छत्रपती, महादेव, अयोध्येचे श्रीराम मंदिर,शेतकऱ्यांच्या आशेचा पाऊस लवकर येऊ दे, राधा – कृष्ण, अध्यात्माबरोबरच – सामाजिक संदेश,विज्ञान – तंत्रज्ञान आदींसह हुबेहूब रांगोळीतून चित्र रेखाटले.
प्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रदीप सुरेश आहिरे व शिक्षिका शिवाली नामदेव सांगळे तसेच मातोश्री शांताबाई सोनवणे स्कुलच्या दीपाली सचिन बोढरे व दर्शना उदयसिंग परदेशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यावेळी सुमारे 85 स्पर्धाकांनी या रांगोळी स्पर्धेत सहभाग घेऊन आपला आनंद द्विगुणित केला.
आयोजक शिवछत्रपती ग्रुपच्या वतीने सर्व स्पर्धाकांना सहभाग नोंदविल्या बद्दल प्रतिज्ञापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शालेय गटात
1आहेर श्रुती संदीप प्रथम व आहेर कांचन मंगेश
2गायकवाड नूतन जीवन व जगझप पूर्वा शिवाजी द्वितीय
3 मयुरी मगर तृतीय येवला
खुला गट
1 रुद्राक्ष वाघ
2 किशोर भोसले व आकांक्षा गायकवाड
3 संस्कृती धुमाळ
असे क्रमाणे देण्यात आले.
यावेळी आलेल्या स्पर्धाकांसोबत त्यांचे पालक, सहकारी, मंडळाचे कार्यकर्ते, व ग्रामस्त यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेकांच्या रांगोळीचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित केले.

