
सिन्नर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सिन्नर महाविद्यालयातर्फे सत्यशोधन दिनानिमित्त (21 सप्टेंबर) प्राचार्य डॉ.आर.एन .भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
म.वि. प्र.समाजाच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे ” वैज्ञानिक दृष्टीकोन व चमत्कार प्रात्यक्षिक सादरीकरण व सत्यशोधन या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यप्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी अंधश्रद्धा ही व्यक्ती, कुटुंब व समाज यांच्या विकासातील प्रमुख अडथळा असल्याचे मत मांडले
विद्यार्थ्यांचा सहभागाने विविध प्रात्यक्षिकातून चमत्कारा मागील शास्त्रीय कारणमीमांसा स्पष्ट केली.
चमच्याने कोणत्याही वस्तूला पाणी पाजणे, पाण्यावर दिवा पेटवणे, माझे श्रद्धा, माझ्या हाती , प्रश्नचिन्ह समतोल आदी प्रयोगातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी नरबळी, जादूटोणा, अघोरीप्रथा,प्राण्यांचा बळी, बाबा बुवांचे मांत्रिक चमत्कारातून सर्वसामान्यांची होणारी शारीरिक, मानसिक,आर्थिक फसवणूक , तसेच अंधश्रद्धा विरोधात जनजागृती निर्माण करण्याची गरज प्रतिपादन केली. कोणतीही गोष्ट जशीच्या तशी स्वीकारण्यापेक्षा तपासून, चिकित्सा करून ती स्वीकारावी असा आग्रह त्यांनी केला.
त्यासाठी प्रश्न विचारण्याची सवय लावून घ्यावी.वैज्ञानिक दृष्टीने विचार करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.यावेळी बोलताना नाशिक जिल्हा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी समाजात वैज्ञानिकांनी दृष्टिकोन व विवेकी विचार रुजविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ बळकट करण्यासाठी तरुणांनी सक्रिय होण्याचे आवाहन केले.

यावेळी विचारवरमंचावर जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य एस.पी.शेलार, कृष्णा चांदगुडे, अं. नि.स.चे डॉ.श्याम सुंदर झळके, स्तंभलेखक प्रा. प्रभाकर चतुर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.एस. पी.शेळके, प्रा. कैलास काळे, प्रा. एस. आर.कुटे, प्रा.जावेद शेख,प्रा. श्रीम. पी पी घोलप, प्रा. श्रीम. सुनंदा जाधव, प्रा. सोनाली कदमआदींनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य एस. पी. शेलार, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.जी.एस. शेळके,सूत्रसंचालन प्रा.श्रीम. पी.पी. घोलप,आभार प्रा. कैलास काळे, फलक लेखन प्रा.एस.आर.कुटे यांनी तर आभार प्रा. कैलास काळे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी कुमारी तृप्ती, अंजली, स्नेहल, आदित्य आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकात उस्फूर्त सहभाग नोंदवला.

