
नांदगाव :(गणतंत्र न्यूज)शिक्षक नेते स्व. आण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या., नांदगाव यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ‘नांदगाव रत्न’ पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता हनुमान नगर, नांदगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुहास आण्णा कांदे, समृद्धी सहकारी बँक लि. नांदगावच्या चेअरमन अंजुमताई कांदे तसेच सहकारी संस्था मुंबईचे अपर निबंधक बाजीराव शिंदे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास नगराध्यक्ष सागरभाऊ हिरे, मा.आमदार अनिलदादा आहेर, माजी सभापती पं समिती, नांदगाव विलासभाऊ आहेर, युवा सेना जिल्हा प्रमुख फरानदादा खान तसेच विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘नांदगाव रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेचे चेअरमन संजय विठ्ठल शेवाळे,व्हा.चेअरमन भाऊसाहेब श्रावण मवाळ व मुख्य लिपिक तथा सहनिबंधक योगेश ऊगलमुगले यांनी सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, सभासद व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

