
१००+ नामांकित कंपन्यांचा सहभाग; १० वी, १२ वी, ITI, डिप्लोमा व पदवीधरांना थेट नोकरीची संधी!
थोडक्यात पण महत्त्वाचे (Highlights):
- दिनांक: मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
- स्थळ: शहीद जाट भगतसिंह शासकीय आयटीआय (ITI), नांदगाव
- सहभागी क्षेत्रे: IT, बँकिंग, आणि MIDC क्षेत्रातील १००+ टॉप कंपन्या
- पात्रता: १० वी, १२ वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा व सर्व पदवीधर
नांदगाव (विशेष प्रतिनिधी):
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या वतीने पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
कौशल्य विकास मंत्री ॲड. मंगल प्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून, नांदगाव व परिसरातील ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या १०० हून अधिक नामांकित कंपन्या थेट मुलाखती (Direct Interviews) घेऊन जागेवरच नोकरभरती करणार आहेत. “नांदगाव व परिसरातील सर्व पात्र तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि वेळेवर उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण करावी.”
श्री. योगेश फेकरीकर (प्राचार्य, शासकीय ITI नांदगाव)
अशी करा ऑनलाईन नोंदणी:
या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरावी:
👉 गुगल नोंदणी लिंक: https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7
सर्व इच्छुकांनी आपले बायोडाटा (Resume), सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड व पासपोर्ट फोटो सोबत आणावेत.

