
दि.२४ सप्टेंबर १८७३ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीची नवी पहाट आणली . दि.२४ सप्टेंबर २०२६ रोजी असलेल्या सत्यशोधक समाजाच्या १५३ व्या वर्धापन दिनानिमित्त या सत्यशोधक समाजाच्या ध्येय आणि विचारांना वंदन करणारी साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
सत्यशोधक समाज
क्रांतीची नवी पहाट
सत्याच्या शोधासाठी निघाला,
एक सत्यशोधक ।
तमाला भेदून गेला क्रांतीचा
एक सत्य सत्यशोधक ॥
सत्यशोधक महात्मा फुलेंचा
विचार सत्यशोधक ।
अज्ञान-अंधार भेदून गेला,
फुलेंचा सत्यशोधक ॥
चोवीस सप्टेंबरची सोनेरी
पहाट सत्यशोधक ।
समतेची नवी वाट देणारा
फुलेंचा सत्यशोधक ॥
स्त्री – शूद्रांना विद्या देणारा
समाज सत्यशोधक ।
अंधश्रद्धेच्या बेड्या तोडणारा
फुलेंचा सत्यशोधक ॥
जाती-धर्मा पेक्षा माणूस श्रेष्ठ
सांगणारा सत्यशोधक ॥
विसरू नका सावित्री जोतीचे कार्य
थोर सत्यशोधक ॥
वर्धापन दिनी वंदू द्वयांना
करांनी प्रणाम ।
सत्यशोधक कार्याला करू या
मनस्वी सलाम ॥
महात्मा फुले आदर्श शिक्षक
पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, अमरावती.८०८७७४८६०९

