
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४०३ वा दिवस

सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा। अमृतस्वरूपा च। यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति। यत्प्राप्य न किंचिद्वाञ्छति, न शोचति; न द्वेष्टि, न रमते, नोत्साही भवति। यज्ज्ञात्वा मत्तो भवति, स्तब्धो भवति, आत्मारामो भवति। नारद भक्ति सूत्र (२-६)
भक्ती म्हणजे भगवंताविषयी परम प्रेम, आणि हे प्रेम अमृतस्वरूप असते. त्याचा लाभ झाल्याने माणूस सिद्ध होतो, अमर होतो, पूर्णपणे तृप्त होऊन जातो. ते एकदाचे लाभल्यानंतर मग त्याला इतर कसलीच आस उरत नाही. कसल्याही हानीने मग तो शोकाकूल होत नाही. मग कुणाचाही त्याला मत्सर वाटत नाही. तो मग कुणाचाही द्वेष करीत नाही. इतर कोणत्याही सुखात मग त्याचे चित्त रमत नाही. कोणत्याही सांसारिक बाबतीत मग त्याला उत्साह वाटत नाही. त्या परमप्रेमस्वरूपाला आकळल्याने मानव आत्माराम होऊन जातो, धुंद होऊन जातो वेडा होऊन जातो. भक्तीच्या रंगात रंगून मनुष्य भगवत्प्रेमात तल्लीन होतो, शांत होतो आणि स्वतःच्या अंतरात्म्यातच परम आनंद अनुभवतो.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास २ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२६
★ १५३४ शिख धर्माचे चौथे गुरू रामदास यांचा जन्मदिन
★ १८६१ प्रदेशातील भारतीय क्रांतीकारकांच्या आधारस्तंभ, १९०७ मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून वंदे मातरम लिखित तिरंगा ध्वज फडकविणार्या महिला क्रांतीकार मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्मदिन.
★ १९५० जेष्ठ क्रिकेटपटू, समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्मदिन.

