
श्री विलास सोनवणे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा व श्रीमती अनिता देवराज(सोनवणे)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेहेळगाव दोघेही दांपत्ये वेहेळगाव केंद्रात कार्यरत आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या 20 वर्षाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विचार करून त्यांना पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्याकडून आयकॉनिक एज्युकेटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी श्री विष्णू मनोहर जे जगप्रसिद्ध असे खवय्य आहेत त्यांनी अनेक वर्ड रेकॉर्ड देखील केले आहेत आणि गिनीज बुक मध्ये हे आपले नाव कोरले आहे तसेच सौं. मीनल कुलकर्णी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संस्थापक अध्यक्ष,श्री शरद पवारसर ट्रस्ट सदस्य आणि नाशिक शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रमुख पाहुणे कार्यक्रमला उपस्थिती होते.श्री व सौं. सोनवणे यांचे शैक्षणिक कार्य खुप छान आहे. त्यांनी आपल्या शाळेविषयी केलेले नवोपक्रम याची चर्चा जिल्हा स्तरावर होत आहे. दोघांनी नवनवीन केलेले शैक्षणिक कामामुळे आधीही अनेक पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.हा सन्मान मिळाल्याने नांदगाव तालुक्यातील अधिकारी, वेहेळगाव केंद्रातील केंद्र प्रमुख तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि नातेवाईक यांच्याकडून ह्या दांपत्यांचे अभिनंदन करण्यात आले.

