
“प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये॥”
गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त मालेगाव कॅम्प परिसरातील आझाद सिंधी सेवा मंडळ, कुलस्वामिनी प्रतिष्ठान साने गुरुजी नगर मित्र मंडळ, श्री समाजसेवा गणेश मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ हिम्मतनगर, श्री गणेश मित्र मंडळ, ओम गणेश मंडळ हिम्मतनगर तसेच हनुमान व्यायाम शाळा मित्र मंडळास शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी काल सदिच्छा भेट दिली.

यावेळी विविध मंडळांमध्ये विराजमान श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आरतीमध्ये सहभागी झाले. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित गणेश भक्तांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या आयोजनाची माहिती जाणून घेतली. तसेच मंडळांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती घेतली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होण्यासोबतच विविध मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविले जात आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने परिसरात निर्माण झालेले भक्तिमय वातावरण आणि गणेश भक्तांचा उत्साह अनुभवायला मिळाला.

यावेळी सर्व मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेश भक्तांना ना. दादाजी भुसे यांनी गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य व समृद्धी नांदो, तसेच सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी श्री गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.


