
इलोड गड, वेरूळ येथे श्री विश्वकर्मा प्रकटदिनी प्रभू श्री विश्वकर्मांच्या प्रांगणात प.पु. महेंद्रभाई बापु पिठाधीश श्रीविश्वकर्मा धाम वेरूळ यांच्या हस्ते ह.भ.प.सौ. पद्माताई प्रकाश सुतार यांनी लिहिलेल्या विराट स्वरूप श्रीविश्वकर्मा या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न झाले. ग्रंथ प्रकाशन क्षेत्रात दर्जेदार साहित्य प्रकाशित करणाऱ्या सदालक्ष्मी प्रकाशन द्वारे नूतन रमेशराव सुतार यांनी सदर ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे लिखाण करताना एशियाटिक लायब्ररी मुंबई, गिता प्रेस गोरखपूर यांच्या धार्मिक ग्रंथ व साहित्याचा खुप उपयोग झाला असल्याचे लेखिकेने स्पष्ट केले.तसेच संस्कृत पंडीत ह.भ.प. रामचंद्र पेनोरे महाराज आळंदी यांचेही मार्गदर्शन मिळाले. या विराट स्वरूप श्री विश्वकर्मा ग्रंथातून विराट सृष्टी निर्मात्याचं मुळ स्वरूप वाचकांना समजणार आहे. या ग्रंथाकरिता शांती ब्रम्ह मारोती महाराज कुरेकर आळंदी यांचे आशीर्वाद मिळाले आहेत. अतिशय प्राचीन आणि परंपरेने चालत आलेले श्री विश्वकर्मा यांचे पौराणिक साहित्य व महात्म्य याचा मागोवा या ग्रंथात ग्रंथ वाचकांना मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

