
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४०४ वा दिवस

अपाणिपादौ जवनो ग्रहीता, पश्यत्यचक्षुः स शृणोत्यकर्णः। श्वेताश्वतर उपनिषद (३.१९)
‘तो परमेश्वर हात नसतानाही सर्व काही ग्रहण करतो, पाय नसतानाही वेगवान चालतो, डोळे नसतानाही पाहतो आणि कान नसतानाही ऐकतो.’ सारे आकाश प्रभूच्या आरतीचे तबक असून त्यात सूर्य-चंद्रांची नीरांजने तेवत आहेत. हे सारे सोडून दुसऱ्या एखाद्या मंदिराची काय बरे गरज? काय मातब्बरी तरी ? सर्व नेत्र तुझेच नेत्र आहेत, आणि तरीही तू अ-नेत्र आहेस, सर्व हस्त तुझेच हस्त आहेत, आणि तरीही तू हस्तहीन आहेस. कशाच्या मागेही लागू नका, काही टाळण्यांचाही प्रयत्न करू नका साऱ्यालाच सादर असा त्याज्य-ग्राह्यभानरहित होऊन जा यदृच्छालाभसंतुष्ट व्हा. जेव्हा काही म्हणता काहीसुद्धा तुम्हाला ढळवू शकणार नाही तेव्हाच तुम्ही मुक्त झाला आहात.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास ३ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०२६
★ अनंत चतुर्दशी
★ पार्थिव गणेश मुर्ती विसर्जन
★ १९१६ जनसंघाचे एक संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन.
★ १९२० भारतीय आकाश संशोधन संस्था इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. सतिश धवन यांचा जन्मदिन.
★ १९२२ स्वातंत्र्यसैनिक, अतिशय विद्वान, स्पष्टवक्ते, संसद सदस्य, घटनातज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्मदिन.
★ १९२८ जेष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचा जन्मदिन.
★ अनंत चतुर्दशीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया…
मंगलमुर्ती मोरया….
पुढच्या वर्षी लवकर या…!

