
सिन्नर ( प्रतिनिधी ) दि. 2 जुलै 2026 रोजी फुले प्रेमींच्या वतीने सिन्नर सार्वजनिक वाचनालयात मराठी वारसा : ‘ सावित्रीबाई ज्योतिराव फुले ‘ या मालिकेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी अभिनेते खासदार डॉ.अमोल कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती रत्न महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर या युगप्रवर्तकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांना” ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिर” ची आकर्षक प्रतिकृती खासदार राजाभाऊ वाजे, महामित्र दत्ता वायचळे, डॉ जी एल पवार यांच्या हस्ते खासदार अमोल कोल्हे यांना देण्यात आली. डॉ.अमोल कोल्हे यांनी ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा करून बहुजन समाजातील सर्व स्तरातील स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुले करून दिली. आजच्या समाजातील स्त्रीया राष्ट्रपती, आयपीएस अधिकारी, शिक्षक,डॉक्टर, वकील,इंजिनियर, राजकारण,समाजकारण, अध्यात्म, सहकार,कला,क्रीडा या सारख्या विविध क्षेत्रात मोठ्या स्वाभिमान व आत्मविश्वासाने काम करत आहेत याचे श्रेय सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सत्यशोधक कार्याला जाते.

त्या काळातील सावित्री संकटांना सामोरे गेली नसती तर आजच्या भारतीय समाजातील स्त्रियांचे स्थान प्रचंड विदारक असते.यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्री यांचे जीवन कार्य समाजाला समजणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीचे शैक्षणिक व सामाजिक विचार समजण्यासाठी ‘ मराठी वारसा : या चैनल वरील “सावित्रीबाई ज्योतिराव फुले ” ही मालिका पाहणे काळाची गरज आहे असे आवाहन अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थितना केले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी ” महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच त्यांचे जीवन कार्य समजून घेण्यासाठी ‘ मराठी वारसा’ या चैनल वरील” सावित्रीबाई ज्योतिराव फुले “यांचे जीवन कार्य समजून घेतल्यास समाजात शैक्षणिक व वैचारिक क्रांती घडून समाज उन्नतीपथावर जाईल. त्यासाठी सर्वप्रथम समाजातील स्त्री शिकली पाहिजे कारण ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सर्व जगाला उधारी” त्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांनी ही मालिका पाहणे काळाची गरज असल्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार छगन भुजबळ साहेबांच्या शुभ संदेशात सर्वांनीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य समजून घेण्यासाठी मराठी वारसा या चैनल वरील’ सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका पाहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी महामित्र दत्ता वायचळे, डॉ. जी एल पवार, नगरसेवक अनिल सरवार,कारभारी वेलजाळी सर,नामदेव कोतवाल, राजेंद्र जगझाप, किरण कोथमीरे अडवोकेट विनोबा गोळेसर, आर.
एन जाधव,राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, महापुरुष स्तंभलेखक प्रा. प्रभाकर चतुर सर, डॉ. दशरथ रूपवते, डॉ. सुशील पवार, डॉ. निर्मला पवार (गायकवाड ),राजाराम मुरकुटे, प्रा. राजाराम मुंगसे, घनश्याम देशमुख, बबन वाजे, मुख्याध्यापिका सौ विजया निळकंठ चव्हाण मॅडम,प्राचार्य मधुकर देशमुख, माजी मुख्याध्यापिका लताताई पवार, सुनील कुऱ्हे सर,चंद्रकांत माळी, भगीरथ भाऊ माळी,डॉ.आर टी जाधव,डॉ संदीप लोंढे, शाहीर स्वप्निल डुंबरे, विशाल चव्हाण, रवींद्र वेलजाळी, विलास दराडे,नितीन साळुंखे, योगेश नाईक,विनायक भिन्नर, अजय शिंदे तसेच समता सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत महामित्र दत्ता वायचळे सरांनी सध्याच्या परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शाहू फुले- आंबेडकर- यांचे विचार समजून- घेणे गरजेचे आहेत. तसेच युवा पिढीला भारतीय युगप्रवर्तक व त्यांचे समाजासाठी असणारी कृती प्रवनता समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.यासाठी सर्व तळागळातील सर्व सामान्य माणसांनी’ सावित्रीबाई ज्योतिबा फुले ‘ही मालिका पाहण्याकरता उपस्थिततांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. जी एल पवार यांनी केले.
अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे व खासदार राजाभाऊ वाजे व सर्वच उपस्थित मान्यवरांचे सावित्रीबाई माध्यमिक विद्यालयाच्या लेझीम पथकाने ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी उपस्थित समता सैनिक,फुले प्रेमी व संविधान प्रेमींनी ‘ जय ज्योती जय क्रांती ‘ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता “महापुरुषांचे लोक कल्याणकारी विचार ” या सामूहिक शपथ घेऊन
झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावित्रीबाई माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ विजय निळकंठ चव्हाण मॅडम, श्री रामकृष्ण हरी मानकर, अशोक चौरे, किशोर पाने कर, सुभाष सांगळे, परमेश्वर पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वी साठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता” महापुरुषांच्या लोक कल्याणकारी वैचारिक सामूहिक शपथेने झाली.

