
प्रथम – कुमारी ताडगे भाग्यश्री यशवंतराव

द्वितीय क्रमांक कुमारी सोनवणे अस्मिता अनिल

तृतीय क्रमांक कुमारी बोरसे उज्वला पितांबर
नांदगाव (प्रतिनिधी)श्री सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र (बी. एड ) महाविद्यालयाचा वार्षिक परीक्षेचा निकाल ९८.६० %. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत एप्रिल 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बीएड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे, ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित श्री सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नांदगाव, ता. नांदगाव, जिल्हा – नाशिक या महाविद्यालयाचा बी एड परीक्षेचा निकाल ९८.६० % लागला असून यामध्ये विशेष प्राविण्यासह कुमारी ताडगे भाग्यश्री यशवंतराव या विद्यार्थिनीने ७९. ९५ % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे, द्वितीय क्रमांक कुमारी सोनवणे अस्मिता अनिल ७९. ५०% व तृतीय क्रमांक कुमारी बोरसे उज्वला पितांबर ७७. १०% या विद्यार्थिनींनी मिळविला आहे, महाविद्यालयातील 70 % पेक्षा अधिक विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे, उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस मा.रमेश आप्पासाहेब पगार, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री दर्शन दादा पगार, संस्थेच्या कोषाध्यक्षा मा.नम्रताताई पगार व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विक्रम घुगे व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या!

