
नाशिक (प्रतिनिधी )कवयित्री विजया कांडेकर यांचे दुःखद निधन झाले..गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमामध्ये त्यांनी एक आठवड्यापूर्वीच सहभाग नोंदवला होता. कविता म्हणजे हृदयातून उमटणारे स्वच्छंद भावना, निसर्गाचा मृद स्पर्श आणि जीवनाच्या अनुभवाचा नितळ आरसा. हळवे अंतर या पुस्तकातून त्यांनी शब्दाच्या प्रवासाकडे जात असताना अनेक प्रसंग अनेक पायवाटा भारून टाकतात हे सत्य मांडले.तेव्हा जीवनातील अनेक प्रसंग अस्वस्थ करतात. काळजाच्या कोपऱ्यात दडलेली हळवी संवेदना उलगडणार्या त्यांच्या कविता म्हणजे हळवे अंतर
भाव अंतरी दाटले हळवे अंतर झाले आयुष्याच्या शेवटी बरेच काही राहून जाते. बरेच काही सोडायचे आणि जोडायचे असते. दुःख कवटाळून जगणं कठीण होतं आणि जगण्याला जगणे हाच पर्याय असतो. अशा आयुष्याची तडजोड करत जगण्याला नवा आयाम प्राप्त करून देणाऱ्या विजयाताई यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन🙏
गिरणा गौरव परिवार महाराष्ट्र

