लेखक:- प्रा. हेमंत पुंडलिक पाटील
क्रीडा संचालक,
केटीएचएम महाविद्यालय नाशि

दिनांक आठ जुलै 2022 हा दिवस जपानच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिलेल्या काही दिवसांपैकी एक दिवस आहे, कारण याच दिवशी जपान मधील नारा शहरात एका प्रचार सभेत सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या शिंजो आबे, यांची नौदलाच्या एका माजी सैनिकाने हत्या केली होती.
स्वर्गीय सिंजो आबे
यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत 2013 मध्ये टोक्यो शहराला 2020 च्या ऑलिंपिक स्पर्धांचे यजमानपद मिळवून देण्यात शिंजो आबे यांचे प्रभावी नेतृत्व यशस्वी झाले होते. ( 2036 च्या ऑलिंपिक साठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांची टीम यजमानपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत) टोक्यो ओलंपिक यशस्वी करून दाखवणे मध्ये स्वर्गीय सिंजो आबे यांची भूमिका निर्णय होती, त्यांनी जगासमोर जपानची सुरक्षितता, खेळांच्या तसेच इतर आधुनिक पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट आयोजन क्षमता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती समोर प्रभावीपणे मांडली होती व त्यांच्या या अथक प्रयत्न ना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने tokyo शहराला ऑलिंपिक आयोजन करण्याची संधी दिली
मात्र 2019,-2020 हा कालावधी , केवळ जपान देशासमोर नव्हे तर संपूर्ण जगासमोर कोविड 19 च्या महामारी च्या प्रचंड आवाहन स्वरुपात उभा राहिला होता व ऑलिंपिकच्या इतिहासात प्रथमच एक वर्षासाठी ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, खरंतर अनेकांची तसेच विरोधकांची मागणी होती की 1940 आणि 1944 या ऑलम्पिक स्पर्धांप्रमाणे याही स्पर्धा रद्द व्हाव्या परंतु स्वर्गीय सिंजो आबे तसेच टोकियो शहराच्या महापौर आणि संपूर्ण जपान देशाने आपल्या देशाच्या स्वाभिमानासाठी या स्पर्धा रद्द न करता पुढे ढकलून 2021 मध्ये आम्ही या स्पर्धा यशस्वी करून दाखवू अशी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती समोर विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि तो विश्वास जपान देशाने सार्थ ही करून दाखविला.
2021 मध्ये संपूर्ण जग मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवा यासारख्या आशावादावर होते, लॉकडाऊन, कर्फ्यू यासारख्या शब्दांना संपूर्ण जग प्रथमच गांभीर्याने सामोरे जात होते. कोविड 19 ची भयानकता किती भयंकर होती हे प्रत्येकाने अनुभवले होते, एरवी ॲम्बुलन्स मध्ये शववाहीकेमध्ये केवळ एक मृतदेह अंत्यविधीसाठी आणला जातो, परंतु पाच मृतदेह एकाच वेळी आणणारी ॲम्बुलन्स मी स्वतः स्मशानभूमीत अनुभवली आह़े. अशाही परिस्थितीत जपान देशाने टोकियो ऑलिम्पिक यशस्वी करून दाखवले. जपान देशाचे किती ही कौतुक केले तरी ते कमीच पडेल. कोविड 19 च्या महामारीतून जगाला बाहेर पडण्यासाठी क्रीडा क्षेत्राने दाखविलेला आशेचा किरण खरंच मोलाचा ठरला
लोक,नागरिक मास्क, सॅनिटरायझर वापरून दैनंदिन जीवन सुरळीत करण्यात हळूहळू यशस्वी ठरू लागले होते.
कदाचित टोकिओ ऑलिम्पिक रद्द झाले असते तर माझ्या मते कोविडची दहशत ,दाहकता निश्चितच अजून वर्षभर राहिली असती.
टोक्यो ऑलिंपिक ने संपूर्ण भारतीयांना नीरज चोप्राच्या भालाफेकी मधील सुवर्णपदकाने एक वेगळा आनंद व स्फूर्ती दिली . अभिनव बिंद्राच्या 2004 च्या अथेन्स ऑलिंपिक मधील सुवर्णपदकानंतर नीरज चोप्रा ने मिळवलेले ते केवळ दुसरेच सुवर्णपदक होते यासोबतच हॉकी मधील केरळच्या श्रीजेश याच्या अप्रतिम गोल रक्षणाने भारतीय हॉकी संघाने मिळवलेले मिळवलेले कांस्यपदक देखील संपूर्ण भारतीयांना प्रेरणादायी ठरले. एकंदरीतच टोकियो ऑलिम्पिक भारताला सात पदके मिळून देणारे ऐतिहासिक ऑलिंपिक ठरले.
खरंतर जगातल्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांचे पदक स्वीकारण्याचा हसरा, आनंदी चेहरा छायाचित्रकारांना संपूर्णपणे प्रमुख अतिथी समवेत टिपता न आलेले कदाचित हे एकमेव ऑलिम्पिक असेल कारण खेळाडू हे
नाईलाजास्तव अनेक वर्षांच्या मेहनतीचे स्वतःचे ऑलिंपिक पदक आपल्या हाताने आपल्याच गळ्यात घालत होते हे संपूर्ण जगाने पाहिले.
आपला भारत देश आणि जपान यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे होते व आहेत. नुकत्याच भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या पंतप्रधान साना ताकाईची यांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी लहान बहीण म्हणून केला होता
स्वर्गीय शिं जो आबे यांनी नरेंद्र मोदी यांचे सोबत जगप्रसिद्ध गंगा आरती देखील केली होती व भारतीय संस्कृतीत नदीला किती महत्त्व आहे याची प्रशंशा देखील केली होती. टोकियो ऑलिंपिकचे शिल्पकार स्वर्गीय शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारास देखील नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहिले होते.
आज या ऑलम्पिक प्रेमी जपानच्या पंतप्रधानांचे पुण्यस्मरण आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पिंपळगाव येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या मैदानावर भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व असलेल्या वडाच्या वृक्षाचे रोपण करून आम्ही या विशेष ऑलिंपिक स्मृती जोपासल्या आहेत.
दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी लावलेला वटवृक्ष आज जोमाने वाढत आहे व खेळाडूंना प्रेरणा देत आहे.
स्वर्गीय शिंजो आबे यांना विनम्र अभिवादन करताना एक गोष्ट अधोरेखित होते दूरदृष्टी असलेले नेतृत्व जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा चेहरा मोहरा, इतिहास बदलू शकते.
टोक्यो ऑलिंपिक हे स्वर्गीय शिंजो आबे यांच्या दूरदृष्टीचे अजरामर स्मारकच म्हणावे लागेल.
स्वर्गीय शिंजो आबे यांना विनम्र अभिवादन

