नाशिकरोड( प्रतिनिधी):- केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या आदेशानुसार २९ जून ते ६ जुलै दरम्यान सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पळसे येथील धनसमृद्धी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक सहकार अधिकारी कैलास आढाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
आपल्या मार्गदर्शनात कैलास आढाव यांनी संचालक आणि सभासद यांना सहकार चळवळीचे महत्त्व सांगितले. समाजातील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासामध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. एकतेसाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हा सहकाराचा मूलमंत्र आहे. सहकार्य, लोकशाही, समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या जतन-प्रसारासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे विचार त्यांनी मांडले.
संस्थेचे चेअरमन शामराव गायधनी, व्हा.चेअरमन शरद ढमाले, जनसंपर्क संचालक मनोज गायधनी, कर्ज समिती अध्यक्ष भारत ढेरिंगे, अल्पबचत समिती अध्यक्ष इंद्रभान जाधव, कार्यकारी संचालक किरण ढेरिंगे, संचालक विजय वाणी, अमोल जाधव, राहुल धात्रक, निलेश मोरे, नितीन ढेरिंगे, संचालिका कोमल तुंगार, ज्योती जाधव, स्वीकृत संचालक एकनाथ आगळे आदी संचालक उपस्थित होते. व्यवस्थापक सुमित गोलाईत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.