
नांदगाव.(प्रतिनिधी)
म. वि. प्र. समाज संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे.भूगोल विभागाच्या वतीने ‘ 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.यु.पाटील हे होते. या प्रसंगी त्यानी जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जावे असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात माहीती दिली.

११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला तसेच जागतिक पातळीवरील विविध देशातील लोकसंख्या विषयाचे धोरण कसे कसे बदलत गेले.लोकांमध्ये कुटुंबनियोजन, लिंग समानता, दारिद्र्य, मातृ स्वास्थ्य, मानवी हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे हे हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे. अर्थातच मानवी जीवन आणि एकूणच मानवी संस्कृतीला आकार देण्याचे व विकासाचे कार्य भूगोलातून घडते असे महत्वपूर्ण विचार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर .डी .झंनकर यांनी सांगितले.

भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.सी.बी.निगळे यांनी आपल्या प्रास्ताविकेत म्हणाले की,११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्यादिन का साजरा केला जातो याची पार्श्वभूमी, मांडताना म्हणाले की,सध्या जगाची लोकसंख्या ही ८.३ अब्ज इतकी असून २०३० मध्ये ती ८.५ अब्ज तर २०५० मध्ये ती ९.७ अब्ज इतकी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक लोकसंख्या १०.९ अब्जचा टप्पा पार होईल असा अंदाज आहे. लोकसंख्या ही त्या- त्या देशाची ताकद असते असं म्हटलं जातं. लोकसंख्येचा आकार किती आहे याचा परिणाम एखाद्या देशाच्या विकासावरही होतो. आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांच्या विकासाला वाढत्या लोकसंख्येमुळे आळा बसल्याचाही दावा केला जातो. आपले भविष्य वाचवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात राहणे अतिशय गरजेचं आहे.भूगोल विषयाचे महत्व सर्व समावेशकता इत्यादी गोष्टींचा उहापोह केला. या कार्यक्रमांप्रसंगी २६ प्राध्यापक व ३० विद्यार्थ्यी उपस्थित होते .या कार्यक्रमास कॉलेजचे IQAC कॉर्डिनेटर प्रा.एम.बी. आटोळे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती आवारे एस.एम.यांनी केले.प्रा.डॉ.आहिरे बी.एम. यांनी आभार मानले.

