
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३२९ वा दिवस

जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या हातून चुका होतात. बिनकामाचे, कामचुकार लोक दुसर्यांच्या चुका, दोष शोधण्यातच आपले संपूर्ण जीवन व्यर्थ घालवतात. अशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वतःच्या चुकांनी त्यांनी स्वतःवर ही दुर्दशा ओढून घेतलेली आहे. इतरांना दोषी ठरवल्यामुळे त्यांच्या अवस्थेत काहीच फरक पडणार नाही. त्यांना कसलाही फायदा होणार नाही. उलट दुसऱ्यांवर दोष लादण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी ते आणखीनच दुबळे बनतात. म्हणून स्वतःच्या दोषांसाठी दुसऱ्या कोणालाही दोष लावू नका. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःच्या शिरावर घ्या.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ २१ शके १९४८
★ जेष्ठ वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. १२ जुलै २०२६
★ ख्रिस्त पूर्व १०० रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्मदिन
★ १८६४ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्मदिन.
★ १९८२ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) नाबार्ड ची स्थापना झाली.
★ २००० थोर कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतीदिन
★ जागतिक कागदी पिशव्या दिन.

