
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा नाशिकरोडयांनी
शनिवार दिनांक ११, जुलै २०२६रोजी
सायंकाळी ६.०० वाजता
ऋतुरंग सभागृह, दत्त मंदिर चौक, नाशिकरोड येथे “काव्य दिंडी” पंढरपूरच्या वारीवरील खुले कविसंमेलन आयोजित केले होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे- संतसाहित्य अभ्यासक श्री.रमेश वाघ व सुप्रसिद्ध कवी व गझलकार श्री प्रशांत केंदळे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सुप्रसिद्ध सूत्रसंचालक व कवी रवींद्र मालुंजकर व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
संमेलनात फक्त ‘वारी/दिंडी’ या विषयावरील स्वलिखित कविता सादर करण्यात आल्या.
संमेलनात अनेक कवी कवयित्रींनी आपल्या स्वरचित रचना सादर केल्या . सर्वांच्या रचना उत्तम होत्या. काशिनाथ महाजन यांनी ‘आम्ही वारकरी’ हा स्वरचित अभंग सादर केला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात या अभंगाचा विशेष उल्लेख केला.
सुप्रसिद्ध कवयित्री व सूत्रसंचालिका सविता पोतदार यांनी सुंदर सूत्रसंचालन केले.
काव्य दिंडीचा समारोप पसायदानाने झाला.
काशिनाथ महाजन
काव्यदिंडीत सादर झालेला अभंग-
आम्ही वारकरी (अभंग)
पंढरीशी जाण्या । मना लागे छंद।
आनंदाचा कंद । भेटे तेथे ।।
आशाढी कार्तिकी । वारीचा सोहळा ।
अद्भुत आगळा । त्रिभुवनी ।।
जगभरातून । भक्तगण येती ।
वंश जातीपाती । विसरुनी ।।
कुणी ना पुसती। कोण ते कुठले ।
सारे एक झाले । विठू-पायी ।।
गळाभेटी घेती । फुगड्या खेळती ।
भक्तीत नाचती । नर-नारी ।।
विठू-रखुमाई । आम्हा माय-बाप ।
भेदाभेद पाप ।जाणतो ना ।।
संतांचा वारसा । हेच आम्हा व्रत।
ओवी अभंगात ।दंग आम्ही ।।
एकमेका म्हणू । आदरे माउली ।।
नमितो पाउली ।भक्ती-भावे ।।
हातांमध्ये टाळ । विठूनाम मुखी ।।
जगी आम्ही सुखी । वारकरी ।।
चंद्रभागेतीरी । आमचे वैकुंठ ।
अन्य नोहे श्रेष्ठ । जगी काही ।।
...काशीनाथ महाजन, नाशिक
फोन ९८६०३४३०१९

