
इनरव्हील जिल्हा 313 ची डिस्ट्रिक्ट असेंबली नुकतीच पुण्यात पार पडली. यावेळी संपूर्ण 313 या जिल्ह्यातील २०२५-२६ या वर्षासासाठी कार्य करणाऱ्या क्लबला पारितोषिक देण्यात आले. इनरव्हील पिंपरीच्या अध्यक्षा म्हणून सविता इंगळे यांनी क्लबचे अध्यक्ष पद म्हणून वर्षभर काम पाहिले होते. 2025-26 वर्षासाठी सविता इंगळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विविध उपक्रम आणि प्रकल्प यशस्वीपणे राबवले आणि या वर्षात एकूण ७० प्रकल्प पूर्ण केले. डिस्ट्रिक्ट असेंबली मध्ये त्यांच्या या कामाची दखल म्हणून युवा विकास, बालहक्क, महिलांचे स्थान, कुटुंब कल्याण आणि इनरव्हील ब्रँडिंग, महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमधील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. “इनरव्हील पिंपरीच्या अध्यक्षपदावर काम करणे अत्यंत समाधानकारक अनुभव होता. या माध्यमातून समाज कार्यासाठी मला माझे योगदान देता आले ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे आम्ही विविध उपक्रम आणि प्रकल्प यशस्वीपणे राबवले. आम्हाला वेळोवेळी जिल्हाध्यक्ष डॉ. आशा देशपांडे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच यांचे श्रेय आमच्या सर्व क्लबच्या टीमला जाते. सर्वांच्या सहकार्यामुळे वर्षभर चांगले प्रोजेक्ट करू शकलो. सर्वांनी वर्षभर दिलेल्या पाठिंब्याबद्दल, सहकार्याबद्दल आणि मौल्यवान योगदानाबद्दल मी माझ्या क्लबच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानते. तुमच्या समर्पण आणि सांघिक कार्याशिवाय हे यश मिळवणे शक्य झाले.” असे मनोगत क्लबच्या अध्यक्ष सविता इंगळे यांनी व्यक्त केले.

