
सत्तेत राम आले काय आणि रावण आले काय
काय फरक पडणार
आम्ही तर भरडलेच जाणार.
अशा गर्भित अर्थाची कविता सादर करून त्यांनी आपल्या शब्दवेल या कवितासंग्रहाचा प्रवास उलगडून सांगितला.प्रवास माणसाच्या अंतरंगात उठलेल्या विविध भावभावनांनी शब्द कागदावर उमटतात.असे भावोत्कट उद्गार कवयित्री नलिनी बागुल यांनी काढले.महाराष्ट्रभर आपल्या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून ऱ्हदयांत कवितांची दीर्घकाळ पेरणी करता करता सामाजिक विषय घेऊन ,बहुजनांच्या कल्याणासाठी या कविता प्रहार करतात असे त्या म्हणाल्या.हुतात्मा स्मारकात संपन्न झालेल्या गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पुस्तकावर बोलू काही या गौरवशाली परंपरा असलेल्या उपक्रमातील 317 व्या भागात त्या आपल्या शब्दवेल या कवितासंग्रहावर त्या बोलत होत्या.पुढे त्या म्हणाल्या की माता सावित्रीबाई आणि फुले हे कवितेतील मुख्य पात्र सजवितात.
फॅशनचा नवा जमाना आला,
जुन्या संस्कृतीचा विसर झाला.
ही भन्नाट कविता त्यांनी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.महिलामुक्ती मधून समाजातील वास्तवावर त्यांनी आसूड ओढला. बाळ,आजी,वृक्षारोपण,
नारीशक्ती,बालपण,छत्रपती संभाजी महाराज, बुद्ध पुन्हा जन्माला या, सिंधुताई सपकाळ,मामाचे गाव,रक्षाबंधन, लालपरी,संस्कार अशा कवितांवर त्यांनी विवेचन केले.या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका रजनी वाणी ह्या होत्या. ज्येष्ठ साहित्यिका अलकाताई दराडे यांच्या हस्ते लेखिकेचा सन्मान करण्यात आला.भाग्यवान विजेते म्हणून राजेंद्र देसले सर आणि सुहास टिपरे सर यांना ग्रंथभेट देण्यात आले.यावेळी साहित्यिक अनंत वाणी यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.सूत्रसंचालन माणूसमित्र सुरेश पवार यांनी तर आभार साहित्यिक माधुरी अमृतकर यांनी मानले.कार्यक्रमास योगाचार्य अशोक पाटील,संजय आहेर, बाळासाहेब गिरी,अशोक कुमावत,एकनाथ वाघ, सुनंदाताई पाटील,राजेंद्र अहिरे, शिवा बागुल आदी साहित्यिक उपस्थित होते दिनांक 30 ऑक्टोबर येत्या शुक्रवारी संजय करंजकर हे त्यांच्या तुझी माझी आई ,सर्वकाही या पुस्तकावर विवेचन करणार आहे.

