
जळगाव येथील अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर आयोजित १७ वर्षांखालील विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत एस. एस. के.पब्लिक स्कूल नायगाव , सिन्नर, नाशिक ग्रामीण संघाने धुळे महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका आणि धुळे ग्रामीण संघांना पराभूत करून विजेतेपद पटकावले.
या उल्लेखनीय यशाबद्दल धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका, क्रीडा प्रशिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

