
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४३८ वा दिवस

भारतात दारिद्र्य आणि अज्ञानातून निर्माण होणाऱ्या समस्या ज्ञानी व शिक्षित स्त्रिया समर्थपणे थोपवू शकतील. आपल्यासारख्या निर्भय, बुद्धिमान व वेदान्तावर प्रभुत्व असलेल्या स्त्रिया जर जगभर जाऊन हिंदूंच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करतील तर सारे जगच वेदान्ती होऊन जाईल. विदुषी,आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या अशा निर्भय स्त्रिया जेव्हा जगभर जाऊन या उदात्त हिंदू तत्त्वज्ञानाचा जे जात, पात, वर्ण वंश किंवा लिंगाच्या पलीकडे जाऊन आत्म्याच्या एकत्वाचा विचार करते त्याचा प्रचार आणि प्रसार करतील, तेव्हा संपूर्ण जगात शांतता, सौहार्द, कायदा, सुव्यवस्था आणि विवेक पसरेल. म्हणजेच जग 'वेदान्ती' होईल.
भारताच्या पुनरुत्थानासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी स्त्रियांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे यात शंका नाही.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास ७ शके १९४८
★ अश्विन वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. २९ ऑक्टोबर २०२६
★ संकष्ट चतुर्थी
★ १८९७ जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते हिटलरचा सहकारी जोसेफ गोबेल्स यांचा जन्मदिन
★ १९११ हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्यांना देण्यात येणार्या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचा स्मृतीदिन
★ १९८५ भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्मदिन
★ जागतिक इंटरनेट दिन.

