
अ.भा.म.सा.प. नाशिक चे आवाहन
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन-
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचेवतीने दिपावली विशेषांक २०२६ स्पर्धा व सन २०२३ ते २०२६ पर्यंत प्रसिद्ध पुस्तक स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ पाटिल यांनी दिली आहे.
सन २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या दिपावली विशेषांकासाठी ही स्पर्धा असुन संपादक, प्रकाशकानी आपले अंक नोव्हें २०२६ अखेर- नवनाथ अर्जुन पाटिल गायकर, मुख्य.कार्या.- आहुर्ली, पो.सांजेगाव, ता. इगतपुरी, जि.नाशिक ४२२४०३ या पत्त्यावर पाठवावे.
तसेच सन २०२३ ते २०२६ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या कथा,कविता,बाल साहित्य, समिक्षा, टिका, कांदबरी आदिसह विविध प्रकारची साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी भाषिक लेखकानीं हया स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गायकर यांनी केले आहे.सविस्तर माहितीसाठी मो.नं. ९८८१३२९७०९/९७६३८२७७०८ यावर संपर्क साधावा.

