
नाशिक ( प्रतिनिधी ) मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक यांच्यातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा नवदुर्गा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026 शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षिका सौ शामल पाटील यांना प्रदान करण्यात आला

या कार्यक्रमात रोहिणी ताई पिंगळे सभापती नगरसेविका पंचवटी विभाग नाशिक, प्रणिता तपकिरे प्रकल्प समन्वयक महिला व बालविकास अधिकारी नाशिक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते
सौ . शामल पाटील सत्तावीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्या सतत कार्यरत असतात. विविध उपक्रम शाळेत राबवत असतात. शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन त्यांना बक्षीस देखील प्राप्त झालेले आहे .जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अनेक बक्षिसे सुद्धा मिळवून दिली आहे. पथनाट्य ,नाटिका पोवाडा लेखन करून दिग्दर्शन करतात
SCERT, जिल्हा प्रशिक्षण संशोधन संस्था नाशिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अशा विविध संस्थेत अभ्यासक्रम निर्मिती, मूल्यमापन पुस्तकनिर्मिती यात योगदान दिलेले आहे
यापूर्वीही त्यांना सार्वजनिक वाचनालय नाशिक आदर्श शिक्षका पुरस्कार, भाग्यश्री सहकारी पतसंस्था आदर्श शिक्षिका पुरस्कार ,गजानन महाराज संस्थान आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
सौ . शामल पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल .एस बी देशमुख, सचिव राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे, रामदास थिटे,अध्यक्ष मुख्याध्यापक संघ ,पुणे सहकारी अणि परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

