
लासलगाव, : (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आल कार्यक्रमाच्या प्रारंभी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक तसेच रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिल गायकर व प्रा. देवेंद्र भांडे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित प्राध्यापक व रा.से.यो. स्वयंसेवकांनी महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांना व स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिल गायकर, प्रा. देवेंद्र भांडे आणि सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

