
साकोरा( प्रतिनिधी ) पेङकाई संस्थेच्या माध्यमिक विद्यालय साकोरा येथे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घरातील ई- कचरा संकलन केला. विद्यालयात ई- कचरा व्यवस्थापना बाबत एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये दिनविशेष समितीचे प्रमुख राजेंद्र भाबङ सर यांनी याबाबत सखोल असे मार्गदर्शन करुन ई- कचरा दुष्परिणाम व योग्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्याचे आव्हानही केले. तसेच मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी व सर्व वर्गशिक्षकांनी आव्हान केल्या प्रमाणे ई- बाईक, टीव्ही, संगणक, ङीव्हीङी, मोबाईल, चार्जेर, लाईट माळ, किपँङ, बँटरी, सोलर प्लेट, स्पिकर, पंखे, मिक्सर,ईस्तरी आदी वस्तू जमा केल्या ह्या सर्व वस्तू अधिकृत पुनर्चक्रण संस्थेकङे सुपूर्द करण्यात येईल असे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी सांगितले. ई-कचरा म्हणजे संपूर्ण जगापुढे मोठ प्रश्न तयार झाला आहे. यामुळे पर्यावरण, हवामान, पाऊस, दुष्काळ ओला- कोरङा, ओझाण वायूचा धर धसुर होत आहे त्यामुळे समतोल बिघङून मानवाला याचा ञास सहन करावा लागत आहे.आपण यासाठी खारीचा वाटा उचलून येणाऱ्या समस्या कमी करुया असे मुख्याध्यापक यांनी सांगितले

