
नाशिक:- (.प्रतिनिधी ) केशरी दुधाचा आस्वाद घेत एकापेक्षा एक सरस आणि विविधांगी कवितांच्या सादरीकरणाने मखमलाबादच्या ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (सर) सार्वजनिक वाचनालयात रौप्य महोत्सवी वर्षाची ‘काव्यकोजागिरी’ खऱ्या अर्थाने रंगली.
प्रमुख पाहुणे कवी वैद्य भूपाल देशमुख, वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, उपाध्यक्ष संदीप धात्रक, कार्यवाह शंकर पिंगळे, संचालक देवराम पवार, सुभाष तिडके, मविप्रचे माजी संचालक सचिन पिंगळे आदी मंचावर उपस्थित होते.
कवी राजेंद्र उगले, अरुण इंगळे, प्रशांत केंदळे, राजेंद्र सोमवंशी, तु.सी.ढिकले, सुरेश पवार, रामचंद्र शिंदे, विनोद बैरागी, अण्णासाहेब बडाख, दीपाली पिंगळे, मधुकर गिरी, वा.र.आहेर, एकनाथ वाघ, सोमनाथ गायकवाड, समाधान हेंगडे-पाटील, योगेश जाधव, प्रवीण पगार, नितीन कोकणे, किरण मेतकर, शिवाजी चव्हाण, संजय आहेर, दत्तू दाणी, राजेश जाधव, अर्जुन वेलजाळी, अजय बिरारी, प्रा.राजेश्वर शेळके, अशोक कुमावत, विलास पंचभाई, अजित सुरसे, जालिंदर औताडे, रघुनाथ हाळदे, विजयकुमार मते, रतन हिरे, राजू आतकरी, सुनील गायकवाड, भास्कर भांडारी, रूपचंद डगळे, दशरथ झनकर आदी सहभागी कवींच्या आशयसंपन्न कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. सेवानिवृत्त शिक्षिका व्ही.बी.संधान प्रायोजित उत्कृष्ट वाचक पुरस्कार मनोज काकड आणि राजेंद्र पिंगळे यांना, तर उत्कृष्ट कवी पुरस्कार तु.सी.ढिकले आणि नितीन कोकणे यांना प्रदान करण्यात आला.
वाचनालयाचे संचालक संजय फडोळ, संजय गामणे, प्रताप काकड, सुभाष काकड, कैलास दराडे, पुंडलिक खोडे, ज्ञानेश्वर पिंगळे, गोकुळ काकड, निवृत्ती महाले, राकाशेठ माळी यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक राजा गायकवाड, नरेंद्र मुळाणे, मधुकर पिंगळे, मुख्याध्यापक अरुण पिंगळे आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचनालयास सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथ हाळदे यांनी मधुकर फडोळ आणि चंद्रभान फडोळ यांच्या स्मरणार्थ रक्कम रुपये अकरा हजार, वस्तू व सेवाकर विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक राज्यकर आयुक्त ज्ञानेश्वर धात्रक यांनी पन्नास ग्रंथ, वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक सुभाष तिडके यांनी महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त महात्मा फुले चरित्राच्या दहा प्रती, संचालक संजय गामणे यांनी पन्नास बाल सभासदांची वर्गणी रक्कम रुपये पाच हजार, कवी अशोक कुमावत यांनी आपल्या साहित्यकृतींचा संच, अपूर्वा क्लासेसच्या संचालिका दीपाली पिंगळे यांनी मौल्यवान ग्रंथसंपदा भेट दिली.
प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भा.व्यं.गिरधारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाचनालयाचे कार्यवाह शंकर पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.गणेश मोगल आणि रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल ग्रंथमित्र राजेश शिरसाठ, सहाय्यक ग्रंथपाल सोनाली पाठक, दशरथ मानकर, संजय मानकर, दीपक माळेकर प्रयत्न केले.

