
गावाला दुष्काळ आला, गावाला दुष्काळ आला,
पाण्यावाचून शेतकरी व्याकूळ झाला।
कोरड्या पडल्या विहिरी, आटले नदी-नाले,
पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसले गाववाले।
निसर्गाने त्याचा कोप दाखविला,
दुष्काळाला आपलाच अहंकार नडला।
नियोजनशून्य माणसांना,
निसर्गाने मोठा धडा शिकविला।
माजू नको, मातू नको,
निसर्गाला कधी हिणवू नको।
पृथ्वीवरील पाहुणा आहेस,
हे कधीही विसरू नको।
विनाशाचे कारण तू बनू नकोस,
स्वार्थापायी निसर्गाला छळू नकोस।
जगाचा विचार कर, वृक्षतोड करू नको,
निसर्गाच्या नियमांना कधी विसरू नको।
पाणी वाचव, झाडे लाव,
धरतीमातेचा सन्मान वाढव।
पावसाचे पाणी जपून ठेवूया,
भविष्यासाठी जलसाठे निर्माण करूया।
एकजुटीने प्रयत्न करूया,
निसर्गाशी नाते जोडूया।
वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन करूया,
दुष्काळमुक्त गाव घडवूया!
तेव्हाच दुष्काळाचे होईल निवारण,
हिरव्यागार गावात फुलेल नवजीवन!
दिलीप नारद (सेवानिवृत्त मुंबई पोलीस)

