
माता, भगीनीचा सन्मान म्हणजे देवीचा सन्मान – आमदार अँड. राहुल ढिकले.
नाशिक दिनांक २७ ऑक्टोबर : स्व. उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीेने दसरा सण साजरा केल्यानंतर समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तर समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या ७१ महिलांना कर्तबगार महिला पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन दिंडोरी रोड, मेरी जवळील छत्रपती संभाजी महाराज चौक, निसर्ग नगर येथील व्हॉलीबॉल मैदानावर करण्यात आले होते.

या नवदुर्गामध्ये ज्योती तिदमे, उर्मी जलवंत, शाजिया शेख, नूतन भानुवांशी, मंदाकिनी पवार, स्वाती वाटणे, जयश्री वाघ, अनघा कुलकर्णी, डॉ. ज्योती केदारे यांचा समावेश होता, तर कर्तबगार महिलांमध्ये रेखा वाघ.अँड. उषा भोसले-जाधव, मोनाली जाधव, स्वाती चटरे, पूजा कुलकर्णी, नितु बिऱ्हाडे, विद्या थोरात, अदिती देशमुख, शीतल खैरनार याचबरोबर तब्बल ७१ महिलांचा समावेश होता.
या गौरव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पूर्व प्रभागाचे आमदार राहुल ढिकले यांच्याबरोबर नाशिक एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र निकम, या कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख छत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, या प्रभागाचे नगरसेवक प्रवीण जाधव, नगरसेविका सौ. सरिता सोनावणे, ओझर नगरपालिकेचे नगरसेवक अशोक कदम, क्रीडा संघटक आनंद खरे, राजू शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते या महिलांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलतांना आमदार राहुल ढिकले यांनी सांगितले की, समाजाचा सर्वात महत्वाचे घटक म्हणजे महिला आहे. या महिला मातेच्या, बहिणीच्या, पत्नीच्या भूमिकेत काम करत असतांना आपली जबाबदारी अगदी उत्तम रीतीने पार पडतात. आपल्या कुटुंबकुटुंबाची योग्य जबाबदारी पार पाडत असतांना आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करतानाच आपल्यातील असलेल्या कलागुणांच्या माध्यमातून समाजासाठी मोलाचे योगदान देतांना दिसतात. त्यामुळे स्त्री किंवा महिला ही देवीचे रूप असून तिला देवीचं दर्जा देणे हे समाजाचे कर्तव्य आहे असे सांगितले. यावेळी राजेंद्र निकम, प्रवीण जाधव यांनीही या कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक करून नवदुर्गा आणि कर्तबगार महिलांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी तर सूत्रसंचालन दीपक निकम आणि कुणाल अहिरे यांनी केले. तर नवदुर्गा आणि कर्तबगार महिलांची माहिती सौ. विजया दुधारे यांनी सांगितली, तर आभार प्रदर्शन अस्मिता मोगल यांनी केले. यावेळी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या किड्स वॉकेथॉन या कार्याक्रमाची घोषणा करण्यात आली आणि जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवहान करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक निकम, अस्मिता मोगल, सौ. विजया दुधारे, ज्योती निकम, मनीषा काठे, आनंद चकोर, गोविंद साळवे, अविनाश वाघ, सतीश बोरा, शैलेश रकिबे आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.

