लेखन:- — नवनाथ अर्जुन पाटिल गायकर

१९७२ ला मुंबई या महाराष्ट्राचे राजधानीला पाणी पाजणारं इगतपुरी तालुक्यातील दगडी वैतारणा धरण पुर्ण झालं.हे पुर्व वाहिनी साखळीतील मोठे धरण होते.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनी या धरणाची पायाभरणी केली होती.त्यानंतर दिर्घकाळ या धरणाचे काम सुरु होते.
१९७२ च्या दुष्काळातच या धरणाचे काम पुर्ण झाले.
या कामाचे निमित्ताने धारगाव व नागोसली या गावाचे मधील पट्टयात वैतारणा नगर वसाहत वसली.या वसाहतीत कामाचे निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्रातुन कामगार या ठिकाणी आले,राहिले व ही वसाहत जणु गावच बनली.
असेच कामाचे निमित्ताने शामराव गडाळे हे विदर्भातुन या ठिकाणी आले, आणि ,कुटुंबासह येथेच रमले.
त्यांच्या पत्नी गयाबाई या गृहिणी होत्या.तीन मुले व एका मुलीस सांभाळत त्यांनी संसाराला हातभार लावायचा म्हणुन वैतारणा येथील भरवस्तीत हॉटेल शिवशंकर उघडले.
जवळपास तीन चार दशके झाले असतील, आज हे निसर्गरम्य पर्यटनाचे ठिकाणचे चवदार हॉटेल म्हणुन विख्यात झाले आहे.लोक खास जेवणासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात.
पती नौकरी करत असतानांच गयाबाईनीं धर्मा तथा बबन, संजय व विजय या तीन मुलासह एका मुलीचा उत्तम सांभाळ करत त्यांना सुसंस्कारीत केले आहे.आज सर्व मुले,मुली सुव्यवस्थित जीवन जगत आहेत.
हॉटेल शिवशंकर हे वैतारणाची आज विशेष ओळख झाले आहे.आज हा व्यवसाय धर्मा गडाळे हा मोठा मुलगा सांभाळत आहे.त्याच्याही हाताला उत्तम चव आहे.
संजय हा कवी असुन तो ही व्यवसायात मदत करतो आहे.
तर लहान मुलगा विजय हा जमीन खरेदी विक्री व्यवसायात काम पाहतो. याशिवाय रा.कॉ.चा ही पदाधिकारी आहे व राजकारणात सक्रिय आहे.
सर्व मुला-मुलीचें लग्ने झाली असुन पती,मुले,सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार त्यांचे पश्चात आहे.
गयाबाईचें नुकतेच निधन झाले आहे.
त्यांचे निधनाबद्दल परिसरात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.येणार्या ग्राहकानां अगदी घरच्या प्रमाणे आग्रह करुन खाऊ घालणारी माय हरपली आहे अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहे.

