
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४५० वा दिवस

सुशिक्षित तरुणांना एकत्र आणा, त्यांना संघटित करा. त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तिः, राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद जागृत करा. आपल्या महान गोष्टी, दैदिप्त्यमान इतिहास त्यांना सांगा. आपल्या देशाची गौरवशाली परंपरा आणि दैदिप्त्यमान इतिहास देशातील तरुणांना माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल आणि त्यातून महान कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.महान त्यागानेच महान कार्य उभे राहते. तरुणांचे उज्वल भविष्य ठरवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांच्याकडे तारुण्याची उर्जा आहे. ते थकलेले भागलेले नाहीत. ते तरुण ऊर्जावान आहेत. तरुणांनी आपली ऊर्जा, बुद्धी आणि तारुण्याचा जोश देशाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी अर्पण केले पाहिजे. सर्वात ताजी, नव्याने उमललेली, अस्पर्शित, सुगंधीत फुलेच केवळ परमेश्वराच्या चरणी वाहीली जातात. तेव्हाच त्यांचे निर्माल्य होते. अन्यथा त्यांचा कचरा होतो.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास १९ शके १९४८
★ कार्तिक शुक्ल /शुध्द १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. १० नोव्हेंबर २०२६
★ बलिप्रतिपदा, दीपावली ‘पाडवा’
★ अभ्यंगस्नान, गोवर्धन पूजन, अन्नकूट
★ विक्रम सवंत २०८३
★ महावीर निर्वाण महावीर जैन संवत २५५३
★ “शिवप्रताप दिन” १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला.
★ १८४८ थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्रकार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्मदिन.
★ १९२० स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्मदिन
★ १९९६ शास्त्रीय संगीत व सुगम संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका माणिक वर्मा यांचा स्मृतीदिन
★ जागतिक विज्ञान दिन.
★ दिवाळीचा सण आला, सर्वानाच पाहिजे केला. परि पाहावा कोण राहिला भुकेला घरी त्यास आमंत्रित करावे गोडधोड भोजन द्यावे, परस्परांनी मिळून चालवावे वैभव सर्वांचे – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

