
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ पाटिल यांजकडुन –
सामाजिक परंपरा, रूढी आणि माणुसकी यांचा वेध घेणाऱ्या आगामी मराठी लघुपट ‘दुखवटा’ चे चित्रीकरण नुकतेच
आटोपले आहे.
लवकरच हा लघुपट प्रेक्षकाचें भेटीस येत आहे.
इगतपुरी तालुक्यातील हौशी कलावंतानी एकत्र येत या लघुपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच याचे चित्रीकरण तालुक्यातील घोटी जवळच्या कांचनगाव या निसर्गरम्य परिसरात केले गेले आहे.
दशक्रिया, लग्नसमारंभ आदी विविध विधी दरम्यान मानपानाच्या प्रथा, परंपरा यावर हा लघुपट भाष्य करतो आहे. या शिवाय माणुसकी जपण्याचा महत्त्वपूर्ण संदेश ही यातुन दिला गेला आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन,कथा- पटकथा व निर्मिती महेंद्र कान्हव, लेखन संजय कान्हव,सहनिर्माता , नेपथ्य गणेश यांनी सांभाळले आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिका कृष्णकांत खरे, जान्हवी फोलाने, शिवाजी क्षीरसागर आणि गणेश बोराडे यांनी
सहकलाकार परसराम क्षीरसागर, रवी क्षीरसागर, आनंद क्षीरसागर, संतोष क्षीरसागर,केतन विसपुते,ललिता क्षीरसागर आणि राणी शिंदे,
बालकलाकार मिहीर क्षीरसागर, रेणू बोराडे, रोशनी भगत, रोहिणी भगत व वैभव क्षीरसागर यांनी अभिनय केला आहे.
लघुपटाचे छायाचित्रण, संकलन आकाश शिंदे यांनी केले आहे.
MK FILMS मोखाडा या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार होत असलेला हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मार्गदर्शक, समाजसेवक आणि व्यावसायिक ह.भ.प.श्री निवृत्तीशेठ राऊत (खर्डी) यांनी लघुपटाच्या संपुर्ण समुहाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी धार्मिक विधी,परंपरातील विविध रुढी,प्रथाचीं नव्याने समिक्षा केली जावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
समाज्यातील इतर मान्यवरांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
चित्रपटाच्या पुढील प्रवासासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा!

