
प्रा.भगवान इंगळे लिखित ‘लोभस’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा; सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची उपस्थितीसोलापूर : प्रा. भगवान इंगळे लिखित, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या चरित्रावर आधारित ‘लोभस’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे राहणार असून, राजीव खांडेकर (वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष, एबीपी माझा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, ‘प्रहार’चे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, तसेच शैक्षणिक संयोजक डॉ. प्रा. विश्वनाथ साठे यांची उपस्थिती लाभणार आहे. खासदार प्रणिती शिंदे आणि प्रा. आशा इंगळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुमुक्षी भजक करणार आहेत.प्रा. भगवान इंगळे यांनी लिहिलेल्या ‘लोभस’ या ग्रंथातून सुशीलकुमार शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनप्रवासाचा वेध घेण्यात आला आहे. या पुस्तकाची मूळ किंमत ५०० रुपये असून, प्रकाशन सोहळ्याच्या ठिकाणी ते सवलतीच्या दरात २५० रुपयांना उपलब्ध होणार आहे.याशिवाय भगवान इंगळे यांची ‘ढोर, भिडु, , उभारणी, ’ मावलाया,आणि नीलम इंगळे यांचे ‘नभांगण’ या पुस्तकांसह एकूण सात पुस्तकांचा संच सवलतीच्या दरात १,००० रुपयांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, वाचक, पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

