
नाशिकरोड:( प्रतिनिधी) – येथील जगताप मळ्यातील यश नितीन कुलथे यांनी प्रतिष्ठित ‘सनदप्राप्त वित्त विश्लेषक’ (CFA-Chartered Financial Analyst) परीक्षेच्या तिन्ही स्तरांमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याने परिसराची मान उंचावली आहे.मे २०२३ मध्ये सीए (सनदी लेखापाल) ही पदवी उच्च श्रेणीत प्राप्त केल्यानंतर २०२४ ते २०२६ या कालावधीत तिन्ही स्तरांच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या.

सीएफए ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेली वित्तीय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित पात्रता आहे. या अभ्यासक्रमामध्ये गुंतवणूक व्यवस्थापन, शेअर बाजार, आर्थिक विश्लेषण आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास केला जातो. या पात्रतेमुळे जागतिक स्तरावर वित्तीय आणि गुंतवणूक क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात. यश यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

