अंदरसुल ( प्रतिनिधी )/शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रासह परराज्यात देखील शेतकरी व फळबागासाठी उपयुक्त ठरलेल्या भुमि अमृत खत’ व ‘भुमी चार्जर टेक्नॉलॉजीच्या खत व लिक्विड’ या शेती उत्पादनांची माहिती थेट आपल्या दरेवाडी येथील शेतात असलेल्या फळबागा मध्ये वापर करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.यानी दखल घेतली आहे अशी माहिती भुमी चार्जर टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक तुकाराम मुखेकर यांनी अंदरसुल येथे पत्रकारांशी बोलताना दिली
शेतीचे उत्पादन वाढवून जमिनीचा कस टिकवून ठेवणाऱ्या भुमि अमृत खत’ आणि ‘भुमी चार्जर लिक्विड’ या सेंद्रिय शेती उत्पादनांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष दखल घेतली आहे.
मुखेकर म्हणाले की शेतकऱ्यांसाठी वरदान हि खते व लिक्वीड उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरत असल्याने शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बिघडलेली जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी हे उत्पादन प्रभावी ठरत आहे. भुमि अमृत खत व उत्पादन जमिनीतील उपयुक्त जिवाणू वाढवते तर भुमी चार्जर लिक्विड पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून उत्पादनात भरघोस वाढ करते कमी खर्चात अधिक उत्पादन आणि जमिनीचा कस टिकवून ठेवण्याच्या वैशिष्ट्यामुळे राज्यभरातील शेतकरी हे उत्पादन मोठ्या प्रमाणात वापरत आहेत.उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक या उत्पादनांची माहिती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रासायनिक खतांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि जैविक शेतीकडे वळले पाहिजे. भुमि अमृत आणि भुमी चार्जर सारखी उत्पादने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करतील. शासन असे उपक्रम राबवणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देईल देत असुन केंद्र व राज्य सरकार देखील यासाठी मोठा प्रयत्न करीत आहेयावेळी त्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींकडून उत्पादनाची प्रक्रिया, वापर आणि परिणाम यांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
शेतकऱ्यांचा विश्वास
उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, भुमि चार्जर टेक्नॉलॉजीचे भुमी अमृत खत ,भुमी चार्जर , लिक्वीड मॅझिक सायझर वापरल्याने जमीन मऊ होते पाण्याची बचत होत शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

अंदरसुल / दरेवाडी येथे फळबाग शेतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंपनीच्या उत्पादनाची माहिती देताना संचालक तुकाराम मुखेकर दिसत आहे

