
नासिक =( प्रतिनिधी)= राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्त श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी तर्फे “” महाराष्ट्र अहिल्यारत्न पुरस्कार सन्मान सोहळा 2026 आयोजित केलेला आहे. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात केलेल्या योगदानची दखल घेऊन सुहास टिपरे, जेष्ठ साहित्यिक यांना “” महाराष्ट्र अहिल्या रत्न पुरस्कार 26 ” यांना संस्थे च्या वतीने पुरस्कार घोषित केलेला आहे. कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी प. पु. ब्रम्हा कुमारी पुष्पा दीदी, व प्रमुख पाहुणे म्हणून तेजश्री आंबेकर, सहायक पोलीस निरीक्षक सातपूर आहेत शिवाय विविध क्षेत्रात असलेले मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे 25 ऑक्टोबर रोजी नाईस संकुल सातपूर नासिक येथे हा कार्यक्रम होणार असून सुहास टिपरे यांचे साहित्यिक क्षेत्रात असलेल्या मान्यवर यांनी अभिनंदन केलें आहे. या कार्यक्रम चे आयोजन श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी च्या उप अध्यक्ष सौं शिल्पा झरेकर, अध्यक्ष सौं अरुणा दरगुडे व सचिव रंगनाथ दरगुडे यांनी केलें आहे!!

